राज्यातील पशूवधगृहांवर आयकर विभागाच्या धाडी !
मुंबई – राज्यातील पशूवधगृहांवर १७ जानेवारीपासून आयकर विभागाने धाडसत्र आरंभले आहे. मालेगाव, पुणे, भिवंडी, मुंबई, सोलापूर या शहरांसह आयकर विभागाने राज्यभरात ही कारवाई केली. पशूवधगृहांकडून देण्यात आलेल्या विवरण पत्रात काही त्रुटी असल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आयकर विभागाने काही कामगारांना संबंधित आस्थापनातून बाहेर काढले आहे.