वारजे (पुणे) येथे गोवंशियांची अवैधरित्‍या वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांविरुद्ध तक्रार प्रविष्‍ट !

पुणे – वारजे मार्गे कात्रजच्‍या दिशेने टेंपोमधून गोवंशियांची अवैधरित्‍या वाहतूक होत असल्‍याची बातमी गोरक्षक शिवशंकर स्‍वामी यांना मिळाली होती. शिवशंकर स्‍वामी यांनी त्‍यांच्‍या सहकार्‍यांच्‍या साहाय्‍याने टेंपो थांबवला. टेंपोमध्‍ये ३ देशी गायी आणि १ बैल अशी एकूण ४ जनावरे दाटीवाटीने ठेवलेल्‍या अवस्‍थेत दिसली. या प्रकरणी टेंपोमालक असिफ शेख, चालक अमीर शेख आणि शोएब कुरेशी यांच्‍याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली आहे. (गोरक्षकांनी गोमांस पकडून दिल्‍यावर वाहनचालक आणि वाहन यांवर केवळ कारवाई करण्‍यात येते; मात्र गोहत्‍येचे मूळ सूत्रधार मोकाटच रहातात. गोहत्‍या रोखण्‍यासाठी मुख्‍य सूत्रधारांवरच कठोर कारवाई करावी, तसेच गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गोवंशियांच्‍या अवैध वाहतूक करणार्‍यांमध्‍ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा हा परिणाम आहे, असे म्‍हटल्‍यास चूक ते काय ?