ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक व्यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश !
सातारा, १८ जानेवारी (वार्ता.) – ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक व्यय तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करावा. तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केला जाईल ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिले.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि जे बिनविरोध निवडून आले, अशांनी निवडणूक व्ययाचा तपशील ३० दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी विहित नमुना आणि प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदारांकडे हा तपशील १९ जानेवारीपर्यंत सादर करायचा आहे. याविषयी ग्रामपंचायत विभागाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे.