दोन विवाह झालेल्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्याशी तिसरा विवाह !
इस्लाम धर्माची प्रार्थना करण्याची बळजोरी !
विक्रोळी (मुंबई) – दोन विवाह झालेले असतांना शाहनवाज हुसेनने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी तिसरा विवाह केला. त्याने तिला बळजोरीने इस्लाम धर्माची प्रार्थना करायला लावली. या प्रकरणी तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हुसेनसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
वर्ष २०१९ मध्ये हुसेन याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमीष दाखवून विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. हिंदु तरुणीने हुसेनशी विवाह केल्यानंतर तिला हुसेन याच्या यापूर्वी झालेल्या २ निकाहांविषयी माहिती समजली. यावर हुसेनने आधीच्या २ पत्नींना तलाक दिल्याचे हिंदु तरुणीला सांगितले.
हुसेनचे आई-वडील त्याच्याकडे पीडित हिंदु तरुणीविषयी सतत तक्रार करून तिचा छळ करत होते. तिचे घराबाहेर पडणे बंद करण्यात आले. तिला धार्मिक प्रार्थना करण्याची बळजोरी करण्यात आली. अंततः छळाला कंटाळून पीडित तरुणी कुणालाही न सांगता मामाच्या गावाला निघून गेली. ती हरवल्याची तक्रार तिच्या पतीने प्रविष्ट केल्यावर ती मुंबईत आली आणि तिने पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका
|