प्रयागराज येथील माघ मेळ्यात इस्लामी पुस्तकांद्वारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !
|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील माघ मेळ्यामध्ये हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी इस्लामी पुस्तके वाटणार्या ३ जणांना अटक करण्यात आली. यात महमूद हसन गाजी या मदरसा शिक्षकाचा समावेश आहे. अन्य दोघे पूर्वी हिंदू होते आणि नंतर त्यांनी धर्मांतर केले, अशी माहितीही समोर आली आहे. या तिघांकडून २०४ धार्मिक पुस्तके आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Prayagraj: Three Islamists, including a madarsa teacher, arrested for religious conversion attempts at Magh Melahttps://t.co/pa8wtnnIYf
— OpIndia.com (@OpIndia_com) January 17, 2023
१. पोलिसांनी सांगितले की, महमूद हसन गाजी याने चौकशीत सांगितले की, त्याला संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी येथून अर्थपुरवठा केला जात होता. तो ‘बदमें पैगामे बहदानियत’ या संस्थेचा अध्यक्ष आहे.
२. या तिघांनी येथे पुस्तक विक्रीचे केंद्र उभारले होते. त्यांनी हिंदु धर्मातील पुस्तकांच्या खाली इस्लामची पुस्तके ठेवली होती, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी येथील उपस्थित दोघांची नावे विचारल्यावर त्यांनी आशीष कुमार गुप्ता आणि नरेश कुमार सरोज, असे सांगितले. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेल्यावर त्यांच्याकडील आधारकार्डवर त्यांची नावे महंमद मोनिश आणि समीर अशी होती. ते दोघेही इस्लामिया हिमदादिया मदरशाचा शिक्षक गाजी याच्या सांगण्यावरून पुस्तके विकत होते, अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गाजी याला त्याच्या घरी जाऊन पकडले.
३. गाजी हिंदु धर्माला न्यून लेखून इस्लामचे गुणगान करणारी पुस्तके आणि पत्रके वाटत असल्याचे चौकशीत आढळून आले. या पुस्तकांमध्ये हिंदु धर्मग्रंथांतील श्लोकांचे चुकीचे अर्थ प्रकाशित करण्यात आले होते. याद्वारे ते हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते.
४. पोलिसांनी सांगितले की, महंमद मोनिश आणि समीर हे इस्लामी संघटनेशी संबंधित आहेत. मोनिश ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायजेशन’ संघटनेचा उत्तरप्रदेश शाखेचा प्रांत सचिव आहे, तर समीर या संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता आहे. या दोघांनी सांगितले की, ते बर्याच वर्षांपासून संघटनेचे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांना प्रतीमहा प्रत्येकी ५ सहस्र रुपये मिळतात.
संपादकीय भूमिका
|