चामराजनगर (कर्नाटक) येथे मकरसंक्रांतीच्या दिवशीही ख्रिस्ती शाळा चालू ठेवली !
हिंदु संघटनांकडून विरोध !
चामराजनगर (कर्नाटक) – चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लुपेटे येथील ख्राईस्ट सी.एम्.आय. पब्लिक स्कूलने मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्याने शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि दलित संघटना यांनी संताप व्यक्त केला आहे. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना फैलावर घेऊन हिंदु कार्यकर्त्यांनी, ‘शाळेत केवळ ख्रिस्ती धर्माचाच प्रचार करण्यात येतो. तसेच शाळा मुलांच्या डोक्यात केवळ ख्रिस्ती धर्माचे विचार भरत आहे’, असा आरोप केला. शाळेत राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे न लावता केवळ येशूचे चित्र लावल्याच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. शाळेच्या विरोधात गुंड्लुपेटे येथील पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील भाजप सरकारने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! |