‘सनातन प्रभात’मधून दिल्या जाणार्या योग्य दृष्टीकोनांनुसार कृती करून गोवा येथील साधिकेने श्री गणेशाचे विडंबन रोखण्याचा केलेला प्रयत्न !
माँनगाडो खोर्ली येथील एका प्राथमिक शाळेत १२.१.२०२३ या दिवशी खाऊवाटप करण्यात आले. त्या शाळेच्या आवारामध्ये मुलांनी रंगवलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामध्ये श्री गणेशाचे विडंबन करणारी काही चित्रे होती. याविषयी मी शाळेच्या मुख्याध्यापिकांना या चित्रांमधून श्री गणेशाचे विडंबन कसे होत आहे ? हे समजावून सांगितले. ते त्यांना पटले आणि त्यांनी ती चित्रे विसर्जित करायचा निर्णय घेतला. ‘असे योग्य दृष्टीकोन ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधून मिळतात. त्यामुळे तुम्हीही ते चालू करू शकता’, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी लगेच होकार दिला आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक चालू करण्यासाठी बोलावले. यावरून ‘सनातन प्रभात’मधील दृष्टीकोनांचा समाजावर कसा परिणाम होतो, ते लक्षात आले.
– सौ. मीना कामत, पणजी (१४.१.२०२३)