अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून २ कोटी ७७ लाख रुपये संमत !
१३९ शाळा आणि महाविद्यालये अंतर्भूत
मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थी असलेल्या १३९ शाळा आणि महाविद्यालये यांतील पायाभूत सुविधांसाठी वर्ष २०२२-२३ च्या दृष्टीने राज्य सरकारने २ कोटी ७७ लाख ९५ सहस्र ९७४ रुपये इतका निधी संमत केला आहे. यामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थी असलेल्या शासनमान्य अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा-महाविद्यालये यांचा समावेश आहे. याविषयी १६ जानेवारी या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.