वरुण गांधी यांची गळाभेट घेऊ शकतो; मात्र विचारसरणीला विरोध ! – राहुल गांधी
नवी देहली – भाजपचे नेते वरुण गांधी यांची मी गळाभेट घेऊ शकतो; पण मी त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. कार्यालयात जाण्यासाठी माझी मान कापावी लागेल. माझ्या कुटुंबाची एक विचारसरणी आहे, तर वरुण यांनी दुसरी विचारसरणी निवडली आहे. ती विचारसरणी मी स्वीकारू शकत नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले. वरुण गांधी हे राहुल गांधी यांचे चुलत भाऊ आहेत. वरुण गांधी हे राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचे कनिष्ठ दिवंगत बंधू संजय गांधी यांचे पुत्र आहेत.