स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी तिथीनुसार आणि २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी दिनांकानुसार पुण्यतिथी आहे. त्या निमित्त पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.
१. ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक (या हस्तपत्रकाचा वापर वितरणासाठी, तसेच पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठीही करता येईल.)
२. स्वा. सावरकर यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार सांगणारे ८ फूट × ७ फूट या आकारातील प्रबोधनपर फलक
अ. स्वा. सावरकरांना त्रिवार अभिवादन !
आ. भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते स्वा. सावरकर !
इ. हिंदुहितदक्ष स्वा. सावरकरांना नमन !
ई. क्रांतीसूर्य स्वा. सावरकरांना प्रणाम !
उ. क्रांतीकारकांच्या कुलपुरुषाला वंदन !
३. अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते स्वा. सावरकर ! (३ फूट × ४.५ फूट)
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.