गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे आज हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गडहिंग्लज येथे बुधवार, १८ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता शहरात ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथून प्रारंभ होईल, तर दसरा चौक येथे त्याची सांगता होईल. तरी मोर्च्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने भाजपचे श्री. संदीप नाथबुवा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले आहे.