आरोग्‍याविषयी शंकानिरसन

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३६

सकाळी ११ वाजेपर्यंत काही न खाता रहाणे शक्‍य होण्‍यासाठी स्‍वयंसूचना

वैद्य मेघराज पराडकर

सौ. दीप्‍ती आगाशे, रत्नागिरी : सकाळी अल्‍पाहार न करण्‍याचे ठरवले, तरी घरी सर्वांसाठी अल्‍पाहार बनवला जातो. त्‍याच्‍या वासाने भूक लागते. अशा वेळी काय करावे ?

उत्तर :

प्रतिदिन स्‍वतःच्‍या मनाला ‘जेव्‍हा सकाळी अल्‍पाहाराच्‍या वासाने मला खावेसे वाटेल, तेव्‍हा ‘प्रतिदिन केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत जिभेवर संयम ठेवल्‍याने मला निरोगी जीवनाचा आनंद घेता येणार आहे’, याची जाणीव होईल आणि मी घरातील कामे करीन’, अशी सूचना दिवसातून न्‍यूनतम ५ वेळा द्यावी आणि याप्रमाणे आचरण करावे. घरी आवडीचा अल्‍पाहार बनवला असेल, तर त्‍यातील थोडा काढून ठेवून दुपारी जेवतांना खावा. दुपारचे जेवण उशिरा होत असेल, तर सकाळी ११ वाजल्‍यानंतर अल्‍पाहार करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)

लेखमालिकेला प्रतिसाद द्या !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com वर कळवा