अभिनेत्री राखी सावंत हिच्याकडून पतीसमवेतचा खोलीतील व्हिडिओ शेअर !
नाशिक – अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा मुसलमान प्रियकर आदिल खान याच्या समवेत निकाह केल्याचे वृत्त नुकतेच उघड केले होते. आता तिने आदिलसमवेतचा स्वतःच्या खोलीतील व्हिडिओ शेअर केला आहे. यात आदिलने तिला मिठी मारलेली दिसत आहे. त्यात तिने म्हटले आहे, ‘‘माझा नवरा, माझं प्रेम आदिल.’’ हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘राखी सावंत नाटक करत आहे का ? यात तिचा ‘स्टंट’ आहे का ?’, अशी चर्चा चालू आहे.