नाशिक येथे नायलॉन मांजामुळे ११ पक्षी घायाळ, तर ४ पक्ष्यांचा मृत्यू !
नाशिक – मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजा वापरण्यात आल्याने त्यात ११ पक्षी घायाळ झाले असून ४ पक्ष्यांचा मृत्यू झाला. यात ३ कबुतरे आणि १ घार यांचा समावेश आहे. नायलॉन मांजामुळे १५ पक्ष्यांचे पंख कापले गेले. घायाळ पक्ष्यांना वनविभागाच्या तात्पुरत्या उपचार केंद्रात भरती करण्यात आले. नाशिक पोलिसांनी आधीच अनेक ठिकाणांहून नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले होते.
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची हानी होत असतांना नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी का घातली जात नाही ? |