२४ जानेवारीला होणार्या ‘विराट हिंदु मोर्च्या’साठी तहसीलदारांना निवेदन !
२०० हिंदु बांधव उपस्थित
विटा (जिल्हा सांगली) – येथे झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ जानेवारीला ‘विराट हिंदु मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याविषयी निवेदन देण्यासाठी २०० हिंदु बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. प्रारंभी शिवतीर्थावर ‘प्रेरणा मंत्र’ म्हणून सर्व हिंदुत्वनिष्ठांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन दिले. या प्रसंगी सर्वश्री शंकरनाना मोहिते, महेंद्रअप्पा माने, संग्रामनाना माने, विश्वास कोडूलकर, शिवप्रसाद शेंडे, विपुल शहा, अधिवक्ता रोहित पवार, राहुल कदम आदींनी मनोगत व्यक्त केले. शहरातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मोर्च्याला पाठिंबा दर्शवला आहे.
यानंतर तहसीलदार हृषिकेत शेळके यांनाही निवेदन देऊन मोर्च्याच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. समारोपप्रसंगी शिवतीर्थावर ध्येयमंत्र पठण करण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सहकार भारती, डायमंड कल्चरल ग्रुप, श्रीमान हिंदवी प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, जैन समाज, पटेल समाज, ओबीसी संघटना, ब्राह्मण समाज, देवांग समाज, डेमोक्रटिक पार्टी यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाधर्मरक्षणाच्या कार्यात निवेदन देण्यासाठी २०० हिंदु बांधवांचे संघटन ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदी ! |