विटा (जिल्हा सांगली) येथे तरुणीला धमकी देऊन अतीप्रसंग : जाहिद लियाकत शिकलगार याला अटक
विटा – जाहिद लियाकत शिकलगार (वय २५ वर्षे) याने मैत्रीचा अपलाभ उठवून एका हिंदु तरुणीशी जवळीक साधली. यानंतर तिची छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ४ मास अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारीला समोर आली. यानंतर संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर विटा पोलिसांनी जाहिद लियाकत शिकलगार याला अटक केली आहे. जाहिदवर विटा पोलिसांत भारतीय दंड विधान कलम ३७६, ३७६ (३), ३५४, ३५४ (ड), ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘लव्ह जिहाद’ आणि बळजोरीचे धर्मांतर या दृष्टीने अन्वेषण करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
या प्रकरणाचे अन्वेषण ‘लव्ह जिहाद’ आणि बळजोरीचे धर्मांतर या दृष्टीने करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची भेट घेऊन केली. या प्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव आणि हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर, श्री. जगन्नाथ पाटील, तसेच अन्य उपस्थित होते.