काहीही खाल्ले, तरी दात लगेच नीट स्वच्छ करावेत !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३५
‘काहीही खाल्ल्यावर दातांवर अन्नकणांचे पातळ आवरण चढते. याला इंग्रजीत ‘प्लाक् (plaque)’ म्हणतात. दात लगेच नीट स्वच्छ केले नाहीत, तर पुढे ‘प्लाक्’चे बारीक घट्ट दाणेदार पदार्थात रूपांतर होते. याला इंग्रजीत ‘कॅल्क्युलस (calculus)’ म्हणतात. हे एकदा बनले की, ब्रशने दात घासूनही ते जात नाही. त्यासाठी दंतवैद्यांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे लागतात. ते काढले नाही, तर दातांची मुळे दुर्बळ होऊ शकतात, तसेच दात किडू शकतात. यावरून दात निरोगी ठेवण्यासाठी ‘काहीही खाल्ल्यावर नीट चूळ भरून दात बोटांनी चोळून धुणे किंवा ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण काढणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येईल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)
दात निरोगी रहाण्यासाठी तुम्ही काय केले,हे आम्हाला कळवा !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com