नांदेड येथील संत नामदेव मंदिर परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार ! – प्रतापराव पाटील-चिखलीकर, खासदार
नांदेड – जुना मोंढा भागातील संत नामदेव मंदिर परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन भाजपचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे दिले. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून संत नामदेव महाराज मंदिर परिसरात शिंपी समाजाच्या वतीने खासदार चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.