रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. संजीव मुतालिक, दैनिक ‘तरुण भारत’चे पत्रकार, हुक्केरी, बेळगाव.
१ अ. आश्रमातील साधक सर्वांसाठी आदर्श आहेत ! : ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यामुळे ‘स्वतः साधना कशी करायची ?’, हे मला शिकता आले. आश्रमातील सर्व साधक सर्वांसाठी आदर्श आहेत. आतापर्यंत मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होतो; पण आज प्रत्यक्ष आश्रम पहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला कृतज्ञता वाटली.’
२. सौ. सुषमा संजीव मुतालिक, हुक्केरी, बेळगाव.
अ. रामनाथी आश्रमात आल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ शांती मिळाली. मला काही दिवस आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली, तर चांगले होईल !
आ. आपण विदेशी वस्तूंचा वापर न्यून केला पाहिजे; कारण ‘आपल्याला भारतीय संस्कृती विकसित करायची आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २५.११.२०२२)