राजकीय नेत्यांकडून स्वार्थापोटी केले जाणारे हास्यास्पद विधान !
सध्या बर्याच राजकीय नेत्यांकडून ‘मी हिंदू आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे’, असे विधान स्वार्थापोटी सहजपणे केले जात आहे. हिंदु म्हणजे ज्याच्यातून हीन गुण निघून गेले आहेत, अशी व्यक्ती. यावरून हिंदुत्व म्हणजे मानवता किंवा माणुसकी हा गुण ! सध्याच्या राजकीय नेत्यांचे वरील प्रकारचे विधान म्हणजे ‘मी माणूस आहे; पण माणुसकी आणि मानवता यांच्या विरोधात आहे’, असे हास्यास्पद विधान आहे’, असे म्हटले तर त्यात चूक काय ?
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल (८.१.२०२३)