संभाजीनगर येथे प्लास्टिकच्या आस्थापनाला भीषण आग !
संभाजीनगर – ‘वाळूज’ औद्योगिक वसाहतमधील जोगेश्वर परिसरातील एका प्लास्टिक आस्थापनाला १६ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता भीषण आग लागली असून परिसरातील ३-४ घरांनीही पेट घेतल्याचे समजते. दूरवरून आगीचे उटलेले लोळ दिसत आहेत.
औरंगाबादमध्ये वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग pic.twitter.com/iGC0MFV3LD
— News18Lokmat (@News18lokmat) January 16, 2023
ही आग कशामुळे लागली ? हे समजू शकले नाही. या घटनेत किती हानी झाली ? हे समोर आले नाही. ‘साहिल प्लास्टिक चटया’ बनवणारे हे आस्थापन आहे. अग्नीशमनदलाच्या वाहनांनी आग विझवली आहे.