नेपाळमध्ये दक्षिण कोरियाच्या पाद्य्राकडून गरीब हिंदूंचे धर्मांतर !
२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !
काठमांडू (नेपाळ) – येथे दक्षिण कोरियाच्या एका पाद्य्राकडून गरीब हिंदूंचे कधी पैशांचे आमीष दाखवून, तर कधी चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले आहे. पांग चांग असे या पाद्य्राचे नाव आहे.
नेपाल में बुद्ध की जन्मस्थली ईसाई मिशनरियों के निशाने पर https://t.co/V86bpGCGQh
— BBC News Hindi (@BBCHindi) January 16, 2023
१. नेपाळमध्ये होत असलेल्या हिंदू आणि बौद्ध यांच्या धर्मांतरावर ‘बीबीसी’ य वृत्तवाहिनीने एक अहवाल सिद्ध केला आहे. यात ‘पांग चांग याने नेपाळमधील झारलंग गावात एक चर्च उभारले असून त्याला ‘येशूचा विजय’ असे नाव दिले आहे. त्याने या गावातील गरीब हिंदू आणि बौद्ध यांना ख्रिस्ती बनवले आहे’, असे म्हटले आहे.
२. पाद्री पांग चांग हा गेल्या २० वर्षांपासून नेपाळमध्ये रहात आहे. त्याने नेपाळमध्ये ७० चर्च उभारले आहेत. समाजातील लोकांनी स्वत: भूमी दान करून चर्चच्या उभारणीसाठी साहाय्य केल्याचा पांग चांग याचा दावा आहे.
३. ‘बीबीसी’च्या अहवालानुसार हिंदुबहुल नेपाळमध्ये ७ सहस्र ७५८ चर्च बांधण्यात आले असून या संपूर्ण पालटामागे दक्षिण कोरियाचा हात आहे. एका वृत्तानुसार, नेपाळमध्ये ३०० कोरियन मिशनरींची कुटुंबे रहात आहेत.
४. हिंदुबहुल नेपाळमध्ये ख्रिस्त्यांची संख्या सध्या २ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष १९५१ मध्ये येथे एकही ख्रिस्ती नव्हता. सध्या त्यांची संख्या ३ लाख ७६ सहस्र इतकी झाली आहे.
संपादकीय भूमिकावास्तविक भारताने नेपाळमधील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे आवश्यक आहे; मात्र गेल्या ७५ वर्षांतील शासनकर्त्यांना भारतातील हिंदूंचे धर्मांतरही रोखता आलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे. अशात हिंदूंना केवळ हिंदु राष्ट्रच तारू शकते, हे हिंदूंनी आता तरी लक्षात घेऊन त्याच्या स्थापनेसाठी कटीबद्ध झाले पाहिजे ! |
(म्हणे) ‘नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष देश’ बनल्याने मिशनरी कार्याला सुवर्णकाळ !’पांग म्हणतात की, ते वर्ष २००३ मध्ये जेव्हा नेपाळमध्ये आले होते, तेव्हा देशात हिंदु राजघराण्याचे राज्य होते. ते म्हणतात, देवाच्या इतक्या मूर्ती पाहून ते अस्वस्थ झाले होते. वर्ष २००८ मध्ये गृहयुद्धानंतर नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष देश’ बनला आणि तो काळ मिशनरी कार्यासाठी सुवर्णकाळ होता. संपादकीय भूमिकायावरून धर्मनिरपेक्ष देशात मिशनर्यांना धर्मांतर करणे सोपे असते, हे स्पष्ट होते. त्यामुळेच ‘धर्मनिरपेक्ष’ भारतातही मिशनर्यांकडून हिंदूंचे राजरोसपणे धर्मांतर केले जाते आणि कुणीही काहीही करू शकत नाही ! ही परिस्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |