अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वादळामुळे आलेल्या पुरामुळे १९ जणांचा मृत्यू !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात वादळामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या राज्यात आणीबाणी घोषित केली आहे. गेल्या २ आठवड्यांपासून येथे वादळी वारे वाहत असून पाऊसही पडत आहे.
California storms: Biden declares major disaster as more flooding forecast https://t.co/IJxyZxHtq7
— The Guardian (@guardian) January 15, 2023
कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर कार्यालयातील आपत्कालीन सेवा संचालकांनी सांगितले की, हे वादळ राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे वादळ होते. या पुराने लोकांना वर्ष १८६१ मधील पुराची आठवण करून दिली. त्या वेळी पूर ४३ दिवस टिकला होता.