कुडाळ येथील ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या समर्थकांना हाकलून द्या ! – अधिवक्ता राजीव बिले, कुडाळ
पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांच्या उपोषणाला पाठिंबा !
कुडाळ – पानबाजार, कुडाळ येथे चालू करण्यात आलेल्या ‘दावत ए इस्लामी’ संघटनेच्या शाखेची चौकशी करावी, या मागणीसाठी पानबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला माझा आणि संपूर्ण कुडाळवासियांचा पाठिंबा असून या आंदोलनात आम्ही सहभागी होऊ. तसेच ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानच्या आंतकवादी संघटनेला येथे राहून जे पाठिंबा देत असतील, त्या पाकधार्जिण्यांना येथे रहाण्याचा अधिकार नसून त्यांना येथून हाकलून दिले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील प्रसिद्ध अधिवक्ते राजीव बिले यांनी व्यक्त केली आहे. याविषयीचे त्यांचे चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
या चलचित्रात अधिवक्ता बिले यांनी म्हटले की, प्रथमत: ‘दावत ए इस्लामी’ ही सामाजिक संस्था असेल, असे वाटले होते; मात्र याविषयी मिळालेल्या माहितीवरून ही इस्लामी संघटना नसून ती पाकिस्तानी आतंकवादी संघटना असल्याचे लक्षात आले. ही संघटना कुडाळसारख्या शहरात कार्य करते, ही धक्कादायक गोष्ट आहे. या कार्याला पैसा कुठून येतो ? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. कुडाळवासियांनी बाळा राणे यांना पूर्ण पाठिंबा द्यावा आणि या आंदोलनात सहभागी व्हावे, म्हणजे २६ जानेवारीला झेंडावंदन केल्याचे आणि त्याचे पावित्र्य राखल्याचे समाधान आपल्याला मिळेल.