नागपूर येथे मांजाने गळा कापला गेल्याने एकाचा मृत्यू !
नागपूर – घरासमोर खेळणार्या वेद साहू या मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना १५ जानेवारी या दिवशी घडली असून तो जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये इयत्ता ५ वीत शिकत होता. नायलॉन मांजामुळे अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नायलॉन मांजाने गळा कापल्याने लहानग्याचा मृत्यू, संक्रांतीच्या दिवशीच काळाचा घाला#NagpurNews #LatestNews #SaamDigital https://t.co/cHZ0jubqpy
— SaamTV News (@saamTVnews) January 15, 2023
(नुसते असे आवाहन करण्यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) अन्य एका घटनेत १४ जानेवारीच्या दुपारी कुंभार टोली परिसरात कापलेला पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेची धडक बसून कु. वंश धुर्वे या मुलाचा मृत्यू झाला.