संभाजीनगर येथे होलसेल कापड दुकानाला भीषण आग !
संभाजीनगर – १५ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी शहागंज येथील ‘न्यु फॅशन’ या होलसेल कापड दुकानाच्या तिसर्या मजल्यावरील ‘गोडाऊन’ला आग लागली. आगीचा भडका उडाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पहायला मिळाले. महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाच्या ७ बंबांनी पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.