पराक्रमी पूर्वजांचा आम्हाला अभिमान आहे ! – सुधीर मुनगंटीवार
पानिपत शौर्यदिनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे सैनिकांना नमन !
मुंबई, १५ जानेवारी (वार्ता.) – पानिपतच्या युद्धात आमच्या पराक्रमाचा आक्रमण करणार्या अब्दाली याने इतका धसका घेतला की, पुन्हा तो परतून आलाच नाही. वायव्य दिशेवरून पुन्हा भारतात आक्रमण झाले नाही. सर्वस्व पणाला लावून परकीय आक्रमकांना कायमची अद्दल घडवणार्या आमच्या पराक्रमी पूर्वजांचा आम्हाला अभिमान आहे, असे ट्वीट सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणार्या मराठा सैनिकांना अभिवादनासाठी केले. १४ जानेवारी हा दिवस ‘पानिपत शौर्यदिन’ म्हणून पाळला जातो.