मला सुरक्षा पुरवण्यात यावी !
अभिनेत्री उर्फी जावेद हिची मागणी !
मुंबई – मला भाजपच्या सौ. चित्रा वाघ यांनी धमकावले असल्यानेे मला घरात आणि घराबाहेर असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे मला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी अभिनेत्री उर्फी जावेद हिने महिला आयोगाला पाठवलेल्या ‘मेल’मध्ये केली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मुसलमानप्रेमाचा पुळका !
(म्हणे) ‘उर्फी प्रकरणात धार्मिक बाजू निर्माण केली जात आहे !’
या प्रकरणात धार्मिक बाजू निर्माण केली जात असल्याची शंका येत आहे. उर्फीच का ? कंगना राणावत, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ या अभिनेत्रीही तंग कपडे परिधान करतात. त्यांना का विरोध केला जात नाही ? त्यांच्यावरसुद्धा टीका करा, असे विधान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केले आहे.