धमकी देणार्या बेळगाव कारागृहातील बंदीवानाला स्मार्टफोन आणि इंटरनेट यांची सुविधा उपलब्ध !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचे प्रकरण
पोलिसांना पैसे देऊन अनेकांकडे खंडणी मागितली
नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे १०० कोटींची खंडणी मागून त्यांचे कार्यालय बाँबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी बेळगाव कारागृहातून देण्यात आली होती. धमकी देणार्या बंदीवानाचे नाव जयेश उपाख्य शाहीर उपाख्य शाकीर शशिकांत कांथा असे असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला कारागृहात स्मार्टफोन आणि इंटरनेट यांची सुविधा मिळत होती, अशी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र की नागपुर पुलिस ने बताया कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को जेल से धमकी दी जा रही थी. https://t.co/i5SSqpRzhm
— AajTak (@aajtak) January 15, 2023
वर्ष २००८ मध्ये त्याने दरोडा टाकून दोघांची हत्या केली होती. त्याच्यावर आतापर्यंत १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. पोलिसांना पैसे देऊन तो कारागृहातून अनेकांना धमकी देऊन खंडणी मागत होता. त्याच्याकडून नागपूर पोलिसांनी एक नोंदवही जप्त केली आहे. त्यात अनेकांचे क्रमांक आहेत.
गडकरी यांना धमकी दिल्यावर नागपूर पोलीस आयुक्तांनी ‘लोकेशन’ शोधून गुन्हे शाखेचे एक पथक बेळगाव कारागृहात पाठवले. न्यायालयासह दोन्ही राज्यांची अनुमती घेऊन जयेश कांथा याला नागपूर येथे आणण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका
|