अल्पवयीन हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीत नेऊन छेड काढणार्या इमामाला गावकर्यांनी चोपले !
पाटलीपुत्र (बिहार) – येथील मसौढी गावात ६० वर्षीय इमामाने (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) १२ वर्षांच्या हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीमध्ये नेले आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली आणि घरी येऊन घटनेची माहिती दिली.
बिहार के पटना में 12 साल की नाबालिग हिन्दू बच्ची को टॉफ़ी के बहाने मस्जिद में बुला कर छेड़खानी करने वाला इमाम फ़िरोज़ आलम गिरफ्तार।https://t.co/oKk0EQrsYs
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 14, 2023
त्यानंतर पालकांनी गावकर्यांना ही घटना सांगितल्यावर ते संतप्त झाले आणि मशिदीत पोचले अन् त्यांनी इमामाला चोपले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तेथे पोचले आणि इमामाला अटक केली. फिरोज आलम असे या इमामाचे नाव असून तो मूळचा बिहारमधील भागलपूर येथील रहाणारा आहे. या मशिदीमध्ये सर्व धर्मियांच्या मुलांना उर्दू शिकण्यासाठी पाठवले जाते.
संपादकीय भूमिकामशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे ! |