अमेरिकेत भारतियांचे कर भरण्यात भरीव योगदान!
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत जॉर्जियातून निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे खासदार रिच मॅक्कॉर्मिक यांनी संसदेत भारतियांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘अमेरिकी लोकसंख्येत भारतियांची लोकसंव्या केवळ १ टक्के आहे; मात्र त्यांचा कर भरण्यातील हिस्सा ६ टक्के आहे. अमेरिकेत ४२ लाख भारतीय आहेत. हा तिसरा सर्वांत मोठा आशियाई समूह आहे.’’
US congressman Rich McCormick on the floor of the US House of Representatives:
“Although they (Indian – Americans) make up about 1% of American society, they pay about 6% of the taxes. They’re amongst the top producers & they do not cause problems. They follow the laws,”
(1/2( pic.twitter.com/eiR7kB6HTx— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 13, 2023
मॅक्कॉर्मिक पुढे म्हणाले, ‘‘जॉर्जियात १ लाख भारतीय आहेत. ते कायद्याचे पालन करतात आणि करही भरतात. भारतीय समाज उत्पादक आहे. हा समाज कुटुंबकेंद्रित आणि देशभक्त असतो. अशा लोकांसाठी स्थलांतर प्रक्रिया आणखी वेगवान आणि व्यवस्थित केली पाहिजे. भारताचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या अमेरिका दौर्याच्या वेळी बायडेन प्रशासनाकडे ‘बिझनेस व्हिसा’ देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली आहे. यामुळे व्यावसायिक हितांसाठी भारतीय लोक अमेरिकेत येऊ शकतील.’’
निवडणूक निकालांत भारतियांचे महत्त्व !
अमेरिकी निवडणूक निकालांत भारतीय मतदारांची भूमिका निर्णायक होत चालली आहे. अधिकाधिक भारतियांची मते मिळावीत, यासाठी भारतियांना केंद्रभूत ठेवून प्रचार मोहीम आखली जाते.