प्रक्रियाकृत सांडपाणी उद्यानांना देऊन प्रतिदिन २० लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत !
नवी मुंबई महापालिकेचा स्तुत्य प्रयत्न !
नवी मुंबई, १४ जानेवारी (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेने स्वखर्चातून उभारलेल्या पहिल्या ‘टर्शरी ट्रिटमेंट प्लांट’मधील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उद्यानांसाठी वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे प्रतिदिन महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची २० लाख लिटर इतकी बचत होत आहे.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्रात येणाऱ्या दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोपरखैरणे येथे टर्शरी ट्रिटमेंट प्लांट बसवण्यात आला आहे. ज्यामध्ये दररोज 20 एमएलडी पाणी शुद्ध केले जात आहे. pic.twitter.com/pnqPEreJRd
— सार्थ लोकनिती (@lokaniti) November 4, 2022
महापालिकेचे मागील ४ मासांत ११ लाख ५० सहस्र रुपये वाचवण्याचे काम सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे.