‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी. ही संघटना ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून पैसा गोळा करत आहे. फक्त हिंदूंचे सण नव्हे, तर ख्रिस्त्यांच्या ‘ईस्टर’ सणाच्या दिवशीही स्पेन आणि स्वीडन येथे ख्रिस्ती बांधवांनी काढलेल्या मिरवणुकांवरही धर्मांधांनी दगडफेक करून आक्रमणे केली. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांधांची संख्या वाढत आहे, तिथे अशी आक्रमणे चालूच आहेत. आपल्या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्या विरोधात लढा दिला, तसा लढा आता आपल्याला द्यावा लागणार आहे.