अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चुलत्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !
संभाजीनगर – शिक्षणासाठी आजीजवळ रहाण्यासाठी आलेल्या इयत्ता ७ वीतील अल्पवयीन मुलीवर नात्याने चुलता लागणार्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना २९ जानेवारी २०१० या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे घडली होती. (समाजाची नीतीमत्ता खालावल्याचे उदाहरण ! – संपादक) या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. १२ जानेवारी या दिवशी यावर न्यायमूर्ती आर्.एम्. पांडे यांनी आरोपी चुलत्याला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.