सातारा येथे घंटागाडी कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन !
सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचार्यांना ठेकेदाराकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे सातारा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून घंटागाडी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. २ मासांपासून घंटागाडी कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. ‘दुपारी १२ नंतर वेतन देतो’, असे ठेकेदाराने सांगितले. दुपारी १२ नंतरच काम करण्याचा निर्धार घंटागाडी कर्मचार्यांनी केला. यामुळे ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. ठेकेदाराने कर्मचार्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.