कन्नूर (केरळ) येथे घरात झालेल्या स्फोटात एक व्यक्ती घायाळ
घरात बाँब बनवतांना स्फोट झाल्याचा पोलिसांना संशय !
कन्नूर (केरळ) – कन्नूर जिल्ह्यातील थालास्सेरी गावामधील एका घरामध्ये १२ जानेवारी या दिवशी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती घायाळ झाली. पोलिसांनी हा बाँबचा स्फोट असल्याची शक्यता वर्तवली आहे. जितिन नादम्मल याच्या घरात हा स्फोट झाला आहे. यात जितिन घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
Bomb explodes in house in Kerala’s Kannur, 1 injured
Read @ANI Story | https://t.co/d5l4qkKRY8#BOMB #kannur #Kerala pic.twitter.com/xA2w4g627l
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2023
पोलीस आयुक्त अजीत कुमार यांनी, ‘जितिन घरातच बाँब बनवत असतांना हा स्फोट झाला आहे. तो गावठी बाँब बनवून घरात ठेवत होता. अधिक काळ बाँब बनवून ठेवल्यानंतर उष्णतेमुळे त्याचा स्फोट झाला असावा. घायाळ जितिनची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक केली जाईल’, असे सांगितले.