काश्मीरप्रश्नी पाकिस्तानकडून पुन्हा तिसर्या पक्षाच्या मध्यस्थीची मागणी !
इस्लामाबाद – काश्मीरप्रश्नी पाकिस्तानकडून पुन्हा तिसर्या पक्षाच्या मध्यस्थीची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोज यांनी सांगितले की, पाकिस्तान या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या भूमिकेचे आणि तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचे स्वागत करेल. यापूर्वीही अमेरिकेसह इतर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या काश्मीरविषयीच्या भूमिकेचे पाकने नेहमीच स्वागत केले आहे, असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तान ने कश्मीर मुद्दे पर फिर अलापा पुराना राग,पढ़िए पूरी डिटेल#indiapakistan #IndiaTVHindihttps://t.co/INBIYICXZf
— India TV Hindi (@IndiaTVHindi) January 13, 2023
काश्मीरप्रश्नी तिसर्या पक्षाच्या मध्यस्थीला भारताचा प्रथमपासूनच विरोध आहे. जम्मू-काश्मीरचा संपूर्ण भाग हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने भारताचा काही भाग अवैधपणे कह्यात घेतला आहे, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे.
संपादकीय भूमिकासातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्या पाकला सरकारने त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा ! |