मंगळुरूतील नेत्रावती नदीत आढळला बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह !
हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश पुजारी (वय ३६ वर्षे) यांचा मृतदेह नेत्रावती नदीत आढळून आला. ‘राजेश पुजारी यांचा मृत्यू, हा अपघात नाही. या घटनेचा संबंध कर्नाटक राज्यात जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु कार्यकर्त्यांच्या प्रदीर्घ काळापासून चालू असलेल्या हत्यांच्या मालिकेशी असू शकतो’, असा आरोप पुजारी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी बंटवाल शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली.
हिंदू कार्यकर्ता राजेश पुजारी की मौत, कर्नाटक पुलिस ने शुरू की जांच#rajeshpujari #deathcase #Hinduactivists #karnatakanews https://t.co/QXujkO6Xdz
— Dainik Jagran (@JagranNews) January 13, 2023
कर्नाटकातील मंगळुरू जिल्हा हा जातीय हिंसाचाराच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. वर्ष २०१५ मध्येही बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी महंमद अनीस, महंमद इब्राहिम, महंमद इलियास आणि महंमद रशीद यांना अटक केली होती.
संपादकीय भूमिकासरकारने या प्रकरणाचे तात्काळ अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! |