आफताब पूनावाला याने करवतीच्या साहाय्याने केले होते श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे ! – शवविच्छेदनाचा अहवाल
नवी देहली – येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता श्रद्धाचा शवविच्छदेन अहवाल समोर आला आहे. यामध्ये आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर करवतीने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचे समोर आले आहे. आफताब प्रतिदिन हेे तुकडे एकेक करून जंगलात नेऊन फेकत होता. जेथे हे तुकडे फेकण्यात आले, तेथून नंतर हाडे गोळा करण्यात आली होती.
Shraddha Walkar केस में बड़ा खुलासा, आफताब ने आरी से काटी थीं श्रद्धा की हड्डियां #shraddhamurdercase https://t.co/IcnER8n4G8
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) January 14, 2023
पोलिसांना एकूण २३ हाडे मिळाली होती. त्यांच्या तपासणीतून ती श्रद्धाचीच असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या हाडांवरून शवविच्छेदन अहवालही काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.