‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !
हिंदुत्वनिष्ठांची पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनांद्वारे मागणी
पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळी (सांकवाळ) येथील ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखण्यात यावीत आणि तेथे उभारण्यात येत असलेल्या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १३ जानेवारीला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. निदर्शनांनंतर हिंदूंच्या शिष्टमंडळाने पुरातत्व विभागाचे विद्यमान संचालक नीलेश फळदेसाई यांना निवेदन दिले. निवेदन देतांना हिंदुत्व सेनेचे श्री. विनायक मुंगरे, म्हापसा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश नाईक, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मंदार गावडे, राष्ट्रीय बजरंग दल गोवाचे प्रमुख श्री. नितीन फळदेसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर हे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सांकवाळ गावातील सर्वेक्षण क्रमांक २६६/२ मध्ये असलेल्या ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व संरक्षित जागेत अवैध कृत्ये केली जात आहेत. याविषयी शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समितीने ४ जानेवारी २०२३ या दिवशी तक्रार केली होती, तसेच विभागाच्या तत्कालीन संचालक ब्लॉसम मडेरा यांच्याविरुद्ध १६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी डॉ. कालिदास वायंगणकर यांनी तक्रार केली होती; मात्र आजपर्यंत या दोन्ही तक्रारींनुसार कोणतीही कारवाई झालेली नाही.
Unite for Shri Vijaydurga Temple !!
Don't allow land grabbers to make it Christian monument.@YugaantarGoa @sankrant @fgautier26 @Newsumindia pic.twitter.com/rnzGzlQytk— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) January 13, 2023
पुरातत्व विभागाच्या लेखी अनुमतीविना ७ जानेवारी २०२३ पासून या ठिकाणी अवैध कृत्ये चालू आहेत. गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन् अवशेष कायदा, १९७८ आणि नियम १९८० ची कलमे अन् नियम यांचे उल्लंघन केले जात आहे. प्राचीन विजयादुर्गा मंदिराच्या अवशेषांच्या पवित्र ठिकाणी गोमांस आणि डुकराचे मांस शिजवले जाते अन् त्यामुळे या ठिकाणचे पावित्र्य नष्ट होते, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन् अवशेष कायदा याचे उल्लंघन होत आहे.
या गोष्टी लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे कारवाई करावी –
१. संरक्षित स्थळातील अवैध कृत्ये तात्काळ थांबवा.
२. संरक्षित स्थळातील अवैध कृत्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकार्यांना देण्यात यावेत.
३. अवैध बांधकामे पाडून ती जागा मूळ स्थितीत आणावी.
४. ती जागा प्राचीन विजयादुर्गा मंदिराचे अवशेष म्हणून घोषित करा.
५. ब्लॉसम मडेरा यांना त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याविषयी सेवेतून काढून टाका; कारण पुरातत्व विभागाच्या संचालक पदावर राहिल्यापासून त्यांनी सर्व अवैध कामांना पाठिंबा दिला आहे. कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात यावे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ? |