शिपाई महिला कर्मचार्यावर अत्याचार करणारे कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी योगेश पाटील यांना अटक !
जेव्हा कुंपणच शेत खाते…
कोल्हापूर – कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी योगेश पाटील यांनी कारागृहात शिपाई पदावर कार्यरत असणार्या महिला कर्मचार्यावर विवाहाचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केले, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. (ज्या पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वाढू न देण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील कारागृह अधिकार्यांनाच जर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक होत असेल, तर अशा नैतिकताहीन प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहील का ? – संपादक)