प्रदूषण नियंत्रण मंडळ सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांवर कारवाई करणार
पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत वागातोर येथे आयोजित केलेल्या सनबर्न संगीत महोत्सवाच्या आयोजकांवर ध्वनीविषयक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याच्या निर्णय घेतला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले असून सनबर्नविरुद्ध लगेच खटला प्रविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.