प्रार्थनास्थळे आणि कार्यक्रम यांतून ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्या अन्यथा कारवाई ! – फुलचंद मेंगडे, पोलीस निरीक्षक, सावंतवाडी
सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
सावंतवाडी – सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे किंवा विविध कार्यक्रम यांच्या वेळी सर्वाेच्च न्यायालय आणि शासन यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे ध्वनीप्रक्षेपण करण्यात यावे. ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे निर्देश पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी येथील पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिले.
यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाविषयी तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सर्वधर्मियांनी, तसेच शांतता समितीचे सदस्य यांनी याविषयी दक्षता घ्यावी. सर्वधर्मियांनी ध्वनीक्षेपक वापरतांना त्याच्या आवाजाचा इतरांना त्याचा त्रास होणार नाही, तसेच याविषयी कोणतीही तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या वेळी शांतता समितीच्या सदस्यांनी ‘राजकीय हेतूने प्रेरित होऊन कुणी तक्रार करत असेल, तर पोलिसांनी त्याची निश्चिती करावी, तसेच शहरातील शाळा भरतांना रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, याविषयी शाळा व्यवस्थापन समितीशी पोलिसांनी चर्चा करावी’, अशी सूचना मांडली.
हे ही वाचा :
♦ सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन ♦