ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर उपचारासाठी पुण्यात दाखल !
पुणे – वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आहे. कराडकर यांना १२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फलटण येथील ‘निकोप हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. ‘निकोप हॉस्पिटल’मध्ये प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. जे. टी. पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार चालू केले होते. विविध वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उपचारांची दिशा निश्चित झाल्याने त्यांची प्रकृती सुधारली होती ; मात्र सकाळी पुन्हा पक्षाघाताचा दुसरा झटका आला.
ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखलhttps://t.co/AiaH2qD6EC #BandatatyaKaradkar
— Maharashtra Times (@mataonline) January 13, 2023
त्यामुळे अधिक तपासण्या आणि उपचारांसाठी १३ जानेवारी या दिवशी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले असून अतीदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.