ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना नेमक्‍या चुकलेल्‍या शब्‍दावर संगणकाचा ‘कर्सर’ येऊन थांबणे आणि त्‍यामुळे धारिकेतील चुकलेला शब्‍द लक्षात येऊन तो सुधारता येणे

श्री. नितीन सहकारी

‘मी ग्रंथांशी संबंधित सेवा करतो. ‘मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणे आणि इंग्रजी भाषांतर पडताळणे’, असे माझ्‍या सेवेचे स्‍वरूप आहे. मराठीतील लिखाण वाचतांना देव त्‍यातील काही त्रुटी किंवा चुका माझ्‍या लक्षात आणून देतो, उदा. सूत्र क्रमांक चुकलेला असणे, वाक्‍याचा अर्थ स्‍पष्‍ट होत नसणे, माहिती अयोग्‍य किंवा अपूर्ण असणे इत्‍यादी.

मध्‍यंतरी मी ‘कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास’ या ग्रंथाचे भाषांतर करत होतो. तेव्‍हाही देवाने मला भरभरून साहाय्‍य केले. ही धारिका पूर्ण झाल्‍यावर ‘अनवधानाने काही राहून गेले नाही ना ?’, हे पहाण्‍यासाठी मी संगणकीय धारिकेवर वरून खाली दृष्‍टी फिरवत होतो. त्‍या वेळी ‘कर्सर’ नेमकेपणाने एका चुकीवर येऊन स्‍थिरावला. येथे ‘परात्‍पर’ या शब्‍दाच्‍या ऐवजी ‘परापर’ असे चुकीचे लिहिले गेले होते. या ग्रंथात ‘परात्‍पर’ हा शब्‍द १७० पेक्षा अधिक वेळा आला आहे.

‘पूर्ण झालेल्‍या धारिकेवरून दृष्‍टी फिरवतांना देवाने नेमकेपणाने चूक दाखवून दिली’, ही देवाचीच कृपा आहे. त्‍यासाठी देवाच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. नितीन सहकारी, फोंडा, गोवा. (१२.११.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक