सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जण ठार !
मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखांचे साहाय्य !
नाशिक – सिन्नर-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता पाथरे येथे मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात १० प्रवासी ठार, तर २५-३० प्रवासी घायाळ झाले आहेत. या अपघातात बस आणि ट्रक यांचा चुराडा झाला असून अपघातातील मृतांचे कपडे आणि सामान रस्त्यावर विखुरलेले होते. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख रुपये, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि घायाळ झालेल्यांवर शासकीय व्ययाने उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.