दौंड (पुणे) येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तात माहिती उघड
दौंड (जिल्हा पुणे) – येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक जण धर्मांतरित होत असल्याचे उघड झाले आहे. येथील हिंदु कुटुंबीय भीतीच्या वातावरणात जगत असून मुसलमान तरुणांना हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यासाठी ५ लाख रुपये मिळतात. अशा प्रकरणात पोलिसांचे सहकार्यही अल्प असते. काही वेळा हिंदु पुरुषांना धर्मांतर करण्यासाठी ‘हनीट्रॅप’ (खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे) केले जाते. ‘सक्तीच्या धर्मांतरास येथील काही राजकारण्यांचाही पाठिंबा आहे’, असे येथील हिंदूंनी सांगितले. याविषयी ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने याविषयीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
Many Hindus forcefully circumcised in Maharashtra, Muslim youths get rewards for marrying and converting Hindu girl, report says https://t.co/8xtXTv7HeF
— OpIndia.com (@OpIndia_com) January 12, 2023
हिंदूंंनी उघड केलेले भयानक वास्तव
१. एका वर्षात अनुमाने १०० ते २०० लोक येथे धर्मांतरित होतात. त्यांपैकी बहुतेक युवती असतात. त्या केवळ १७ -१८ वर्षांच्या असतात आणि त्यांच्यापैकी बर्याच जणी महाविद्यालयात शिकत असतात. धर्मांध त्यांच्याशी विवाह करतात आणि या युवतींनी मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो. त्यानंतर धर्मांध या युवतींना सोडून देतात आणि पुन्हा दुसरे लग्न करण्यास सिद्ध होतात.
२. धर्मांधांकडून सार्वजनिक ठिकाणी हिंदु तरुणींची छेड काढली जाते. असे असले, तरी कुणीही त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत; कारण येथील राजकारणी या धर्मांधांना पाठीशी घालतात. त्यामुळे कुणीच आवाज उठवायला सिद्ध नाही. लोक या प्रकरणांवर बोलायलाही घाबरत आहेत.
३. या सर्व प्रकरणांमध्ये फारूख कुरेशी, कुमेल कुरेशी, आशिब कुरेशी आणि फरहान कुरेशी आहेत. त्यांच्या विरोधात कुणी बोलत नाही, दहशतीमुळे त्यांची नावेही कुणी घेत नाहीत.
४. काही दिवसांपूर्वी एका मुसलमान महिलेशी विवाह केलेल्या हिंदु तरुणाला बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आले होते. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याची बळजोरीने सुंता करण्यात आली होती. (धर्मांध तरुण हिंदु तरुणींसमवेत आता हिंदु तरुणांचेही धर्मांतर करत आहेत. हे हिंदूंच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. हिंदूंनी आताच सतर्क होऊन धर्मांधांना विरोध करणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकादौंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक ! धर्मांध दिवसेंदिवस उद्दाम होत चालल्याने देशभरात कठोर धर्मांतरबंदी कायदा हवाच, त्यासह त्याची प्रभावी कार्यवाही करणारी यंत्रणाही असणे आवश्यक ! |