पाकमध्ये मुसलमानाकडून १४ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण !
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील तंडोअल्लाहर येथे मुश्ताक भट्टी नावाच्या २२ वर्षीय मुसलमानाने सविता मेघवार या १४ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. यानंतर त्याने तिच्याशी निकाह केला, अशी माहिती नारायण भिल यांनी ट्वीट करून दिली. नारायण भिल हे ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक आहेत. ते पाकमध्ये हिंदूंवर होणार्या आघातांविषयी सातत्याने माहिती देत असतात.
संपादकीय भूमिकापाकमधील असुरक्षित हिंदु मुली ! अशा घटनांच्या संदर्भात कोणतीही मानवाधिकार संघटना, आयोग, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |