जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे निधन
पाटलीपुत्र (बिहार) – जनता दल (संयुक्त) पक्षाचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे १३ जानेवारी या दिवशी देहलीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. शरद यादव यांचे पार्थिव देहलीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
Socialist leader, ex-Union minister, 7-time MP Sharad Yadav passes away at 75 https://t.co/xgj40j1Rnc
— The Times Of India (@timesofindia) January 12, 2023
त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.