दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेट खेळाडू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केले !
पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू सईद अन्वर याचा दावा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेट खेळाडू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू सईद अन्वर याने केला. हाशिम आमला हा भारतातील आय.पी.एल्. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘पंजाब किंग्ज’ या संघाकडून खेळत असतो. सईद अन्वर याचा या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात त्याने म्हटले आहे की, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अनेकांनी मुसलमान धर्म स्वीकारला. हाशिम आमला याने त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या एका हिंदु कुटुंबाचे धर्मांतर केले.
पाक क्रिकेटर सईद अनवर ने किया बड़ा खुलासा, कहा- हाशिम अमला ने हिंदुओं को पढ़ाया कलमा, बनाया मुसलमान#SaeedAnwar#HashimAmla
👉 https://t.co/tK3Xs6Oo00
#HindiNews #Navabharat— NavaBharat (@enavabharat) January 13, 2023
हा किक्रेट जिहाद आहे ! – सामाजिक माध्यमांवरून टीका
सईद अन्वर यांच्या या विधानावरून सामाजिक माध्यमांवरून ‘भारत हाशिम आमला याला आय.पी.एल्.मध्ये कोट्यवधी रुपये कमावण्यासाठी आमंत्रित करतो आणि तोच हिंदु धर्मियांना मुसलमान करण्यासाठी प्रवृत्त करतो’, ‘हा क्रिकेट जिहाद आहे’, अशी टीका करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकायाची चौकशी करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘बीसीसीआय’ने) सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे. जर त्याने खरेच असे केले असेल, तर त्याला आय.पी.एल्.मधून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे ! |